हा येतो काय,
दीड दिवस पाहुणचार करवून घेतो काय...
नी जरा कुठे घरातली इतके वर्षांची कर्ती नी आता 'मार्गदर्शक' झालेली मंडळी, आपल्या नातवंडांना घेऊन शिळोप्याच्या गप्पा मारायला बसताय्त,
तोवर पुनःश्च पुढल्या प्रवासाला निघतो काय...
गेली नव्वद वर्ष हीच प्रथा सुरू आहे...
सुमारे चार पिढ्या...
एकेका घरात कितीएक 'रोल' चेंजेस पाहीले असतील त्यानं आजवर...
काल पर्यंत आईच्या मागे मागे फिरणारी पोरं टोरं, आज गणपतीच्या आगमनाला नी प्रस्थानाला स्वतःहून मुर्ती उचलताहेत... आरत्या घेताहेत, पूजा करताहेत....
काल पर्यंत आरत्या, पूजा करणारी पिढी आज ह्या नव्या पिढीच्या खांद्यावरून, फक्त 'सगळं नीट सुरू आहे ना..' बघत हाती टाळ, झांजा घेऊन शांतपणे उभे राहाताहेत...
कालचं मस्त परकर पोलकं घालून घरभर फिरणारं पिल्लू आज आईला, काकवांना विचारत उकड काढत्ये.. मोदक वळायला मदत करत्ये....
कालच खारीच्या पावलानी आलेली एखादी सुनबाई, आज 'आई, तीन वाट्या खोबरं नी दोन वाट्या गुळ घेऊना?' म्हणत स्वैपाकघराचा ताबा घेत्ये..
काल जातीनं सारणात गुळ किती, तार कशी हवी हे ठरवणारी एखादी सासुबाई, आज आपलं बॅटन पुढल्या पिढीकडे देऊन आपल्या नातवंडांच्या जेवणखाणाचं बघत किंवा वाती वळत, फुलांची, पत्रीची जुळवाजुळव करत बसल्ये...
सगळंच स्वप्नवत....!
------
यार गजानना....
अभी अभी तो आये हो...
बहार बनके छाये हो..
अभी तो कुछ कहा नही....
अभी तो कुछ सुना नही....
बुरा ना मानो बात का...
ये प्यार है गिला नही.....
अभी ना जाओ छोडकर....
के दिल अभी भरा नही....।

No comments:
Post a Comment