साल्ला,
इतके वेळा प्रयत्न करून झाले पण साधी सिगरेट नै सुटते...
लग्न झालं, सोन्यासारखी बायको आणि गोजिरवाणं पोर मिळालं तरी अजून रस्त्यावरून चालत/वाहन चालवत जाताना प्रेक्षणीय स्थळांकडे 'तिरका कटाक्ष' जातोच...
मोदीबाबा इतके जीव काढून सांगताहेत, तरीही ड्राईव्ह करताना पेटवलेल्या सिगारेटचं थोटूक अजूनही तसंच वाट्टेल तिथे टाकलं जातं..
हाफीसच्या कामासाठी फिरताना सकाळच्या ब्रंचवर दिवसभर आपोआप काढला जातो, पण ठरवून 'उपास' करायचं म्हटलं की साबुदाणा खिचडी लागतेच...
'शब्दानं शब्द वाढवून काहीही मिळत नाही, हे अनेकदा कळूनही, आता तिशी उलटून गेल्यावर 'अरे ला का रे' करायची खाज कमी झाली असली तरी अजून पूर्ण गेलेली नाईये..
---
अस्खलीत आचरणाचा विडा उचलून तसं वागताना नैसर्गिकरीत्या वा मुद्दामहून समोर आणल्या गेलेल्या परिस्थितीतही न चळता स्वतःचा दृढनिश्चय जपणं हे येरागबाळ्याचं काम नाही....
इथे तो 'महात्मा'च पाहीजे....

No comments:
Post a Comment