मगाशी मोदीशेठ नी पुतीनकाकांची गळाभेट बघुन आज्जी म्हणाली "मोदींचं म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याकडे म्हणून जातील त्या सगळ्यांशी मैत्री..."
मला एकदम नारायण आठवला....
"नारायणाची म्हणजे जाईल तिथे ओळख हं.."...!
नारायण....
निस्वार्थपणे किती एक शुभकार्य जमवणारा...
लग्नघरात 'मुहुर्तासाठीच्या पंचांगापासून ते वरातीच्या बॅडवाल्यांपर्यंत' चौफेर लढणारा...
सगळ्या साळकाया-माळकाया घेऊन स्वस्तातल्या पण उत्तम प्रतिच्या बस्त्यासाठी नी दागदागिन्यांसाठी अख्खा लक्ष्मी रोड पालथा घालणारा...
सगळी कामं एकेका निष्णात व्यक्तीच्या हातात देऊनही जातीनं प्रत्येक कामावर बारीक लक्ष ठेवणारा...
नी इतकं सगळं असुनही दागिन्यांचा डबा ठेवलेल्या फडताळाची चावी आपल्या काखोटीला घेऊन फिरणारा...
प्रसंगी स्वतः बोहलं झाडणारा...
नी मुहुर्ताच्या वेळी दोन अक्षता उडवून पुढल्या कामाला पळणारा...
लग्नघरात चहू बाजूंनी होणार्या हल्ल्याला समर्थपणे तोंड देत तहान-भूक-झोप विसरत खिंड लढवणारा....
---
.
.
.
नी कार्य संपल्यावर
"आपण एवढं काम केलंय, आता लोकांनी आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला मान द्यायलाच हवा" असली कुठलीही फालतू अपेक्षा न धरता
आणि
इतर कुणाला फारशी तोशीस लागु न देता,
तिथेच एखाद्या कोपर्यातल्या कोचावर अंग पसरणारा....
========
तो तिथं आहे म्हणून जरा कुठे वाटेवर येत चाललंय हे सगळं....
नाईतर ह्या घरभेद्यांनी देश विकायलाच काढलाव्हता सगळी लाज कोळून पीत...

No comments:
Post a Comment