Saturday, 20 June 2015

पाऊस...!

जुलै चा सुसाट पाऊस.. इतका की अंगावर रेनकोट असुन नसल्यासारखा..! गाडीची टाकी फुल करायची, अॅमिटर सेट करुन किक मारायची, "ढब्ढब ढब ढब" असा  पहीला 'थंप' आला की अॅक्सलरेटर द्यायचा, क्लच मारुन पहीला गियर उचलायचा..!                                       कुठला तरी छानसा 'स्टेट हायवे' धरायचा, गाडी चौथ्या गियर ला लावायची, गियर वरचा पाय नी क्लचवरचा हात दोघांना उसंत द्यायची.. गाडीच्या कानात वारं शिरु द्यायचं.. नी ह्या नश्वर जगातुन हलकेच दुर व्हायचं..! संदीप खरे' म्हणतात तसं " कुठे जायचे - यायचे भान नाही.. जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा.. न कुठले नकाशे, न अनुमान काही.." 
               आता फक्त ऐकु येतोय वारा..   मनातला देवानंद म्हणतोय " मैं जिंदगी का साथ निभाता चला गया.. "  नी बॅकग्राउंड स्कोर म्हणुन गाडीच्या इंजिनाचा 'हम्म्म्म्म' असा आवाज..!
              असे कितीएक हजार मैल तुडवलेत आजवर.. पण "ये नशा तो मानो कम होने का नामही नही लेता.."

No comments:

Post a Comment