Saturday, 20 June 2015

मोह मोह के धागे..!

" ये मोह मोह के धागे..
तेरी उंग्लीयो से जा उल्झे.."

" सा रे ग ग ग ग म' रे सा नी..
नी रे प रे ग रे सा नी सा सा.. "

काय कमाल गाणं आहे राव..!
अन्नु मलिक काकांनी ब-याच काळानंतर इतकं छान गाणं केलय..!



है रोम रोम इक तारा..
जो बादलों मेंसे गुजरे..!
" प म' ग ग म' म' प प  'ध 'ध
नी नी 'ध 'ध नी 'ध 'रे नी 'ध प म' ग म' ग..!"
खल्लास...!
इथे मलिक काका'ना
 "चलती है क्या नौ से बारा" नी तत्सम गोष्टी माफ होतात..!

ह्याला ' सुर-संगत ' म्हणतात..!
ह्या संगतीत स्साला, कोणी पण काही पण करुन जातो..!

पुर्ण गाणं येथे ऐका :
https://m.youtube.com/watch?v=JbDktrsnH40

सत्कारणी शनिवार...!

अजुन काय हवंय?

शनिवार रात्र....
आपली बायको नी आपलं बाळ दोघांनाही ( Good Night Formalities करुन )  झोपवायचं...
मग  स्वयपाकघरातल्या शीतकपाटाला साक्षीठेवुन आपला ग्लास भरायचा..

ग्लास भरतो न भरतो तोवर आपल्या अत्यंत प्रिय अशा (चतुष्पाद ) मित्राने स्वयपाकघराच्या खिडकीतुन आपलं कृष्णवर्णीय मुखकमल दर्शवित ' मी जागा आहे' ची ग्वाही द्यायची..

नी पुढचे तीन तास द्वादशीच्या धुंद चांदण चुड्यात  ह्या जीवश्चासोबत सुखादु:खाच्या गोष्टी करत रात्र जागवायची..
आता ग्लास सुटतोय..
चंद्रही बराचसा पश्चिमेला कलतोय...
आमचा मित्र आळोखे देउ लागलाय..
ही घडी हलकेच धरायची..
खुर्ची सोडुन जमिनीवर यायचं..
आपल्या मित्राचं तोंड मांडीवर घेउन त्याला गुंगी येइस्तोवर ' मै ज़ि्ंदगी का साथ निभाता चला गया" असं गुणगुणत थोपटत राहायचं...

आता आपला दोस्त पारच गुंगलाय..
आपणही "फिक्र को धुए मैं" वरुन
" ज़िंदगी ख़्वाब हैं, ख़्वाब मै सच है क्या, और भला झुठ है क्या ?" वर आलोय...
आता शांत पणे एखादा कैलास खेर " सैंया..       सैंया..         तुजो छुंले प्यारसे, आरामसे मर जाऊँ" घेतलाय नी लगेच..       "आवारा हूँ..       आवारा हूँ..  या गर्दीश मैं हूँ आसमान का तारा हूँ" म्हणत सुंदर भैरवी घेतल्ये..!
एव्हाना एकीकडे संपलेला ग्लास धुवुन ओट्यावर पालथा पडलाय, सोडाबाटली केराच्या टोपलीथ गेल्ये....
मोकळ्या आकाशाखाली शांतपणे पहुडलेल्या माझ्या मित्राला शुभ रात्री करुन निजधामाला पोहोचलोय..




अशा रितीने अजुन एक शनिवार सत्कारणी लागला..
चला,
उद्या सकाळी ७ ला ( आमचं पोर उठतं म्ह्णुन) उठायचय .. !

शुभ रात्री..!

पाऊस...!

जुलै चा सुसाट पाऊस.. इतका की अंगावर रेनकोट असुन नसल्यासारखा..! गाडीची टाकी फुल करायची, अॅमिटर सेट करुन किक मारायची, "ढब्ढब ढब ढब" असा  पहीला 'थंप' आला की अॅक्सलरेटर द्यायचा, क्लच मारुन पहीला गियर उचलायचा..!                                       कुठला तरी छानसा 'स्टेट हायवे' धरायचा, गाडी चौथ्या गियर ला लावायची, गियर वरचा पाय नी क्लचवरचा हात दोघांना उसंत द्यायची.. गाडीच्या कानात वारं शिरु द्यायचं.. नी ह्या नश्वर जगातुन हलकेच दुर व्हायचं..! संदीप खरे' म्हणतात तसं " कुठे जायचे - यायचे भान नाही.. जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा.. न कुठले नकाशे, न अनुमान काही.." 
               आता फक्त ऐकु येतोय वारा..   मनातला देवानंद म्हणतोय " मैं जिंदगी का साथ निभाता चला गया.. "  नी बॅकग्राउंड स्कोर म्हणुन गाडीच्या इंजिनाचा 'हम्म्म्म्म' असा आवाज..!
              असे कितीएक हजार मैल तुडवलेत आजवर.. पण "ये नशा तो मानो कम होने का नामही नही लेता.."

ये हसीं वादीयाँ.. ये खुला आसमा..

"ये हसीं वादीयां,
ये खुला आसमा..
आगये हम कहा,
एय मेरे साजना.."
'रोज़ा' मधलं रेहमान साहेबांचं  सुंदर गाणं..!
हिमालयच्या कुशीत मधुचंद्रासाठी गेलेले 'रोजा आणि ऋषिकुमार..'

'मेरी जानेजा..
मैं तेरी चाँदनी.."
काय कमाल षड्ज लागलाय..!
खरं सांगतो मंडळी..!
कधी हिमालयात 'दोघंच' (केसरी/वीणा सारख्या टुर्स बरोबर नाई.. तुमचं तुम्ही..") गेलात.. ( आणि जा च! असं)..
तर..
आपली दोघांची राखीव अशी एखादी गाडी घ्या ( शक्यतो SUV.. 
हवं तिथे जा.. हवं तेव्हा थांबा, ह्या हिशोबातली..) ..
नी मनाली ते रोहतांग..
कसौल ते मनीकर्ण,
शिमला आऊटस्कर्ट्स..
किंवा थोडं अजुन वर...
जम्मु ते श्रीनगर ( जवाहर टनेल नंतर कुठेही)
सोनमर्ग ला, पेहेलगामला, किंवा अनंतनाग ला..
किंवा पूर्ण उत्तर टोकाला..
(अर्थात) कारगिल- द्रास रस्त्या ला,
डिस्किट ला,  खारदुँगला च्या रस्त्यावर, नुंब्रा व्हॅलीत, पँगाँग सरोवराच्या रस्त्यावर..
जिथे कुठे गाडी बाहेर बर्फ दिसेल तिथे..
गाडी थांबवा..
गाडीतल्या डेक वर फुल  व्हॅाल्युम ला हे गाणं लावा..
नी तुमच्या तिला/त्याला घेउन गाडीतुन बाहेरच्या कुडकुडवणा-या थंडीत उतरा..!




त्या क्षणी तुम्ही " मधु आणि अरविंद स्वामी " झालेले असता..
पुढचं गाणं आपोआप जुळत जातं..
" ये बंधन है प्यार का देखो टूटे ना सजनी..
 ये जन्मो का साथ है देखो छूटे ना सजना..
 तेरे आँचल की छाँव के तले मेरी मंजिल मुझे मिल गयी
 तेरी पलकों की छाँव के तले मोहबत मुझे मिल गयी..."
एकदा अनुभवुन बघाच..!
अजुन काय पाहीजे राव?
https://m.youtube.com/watch?v=Bp1pGcQtJ3M

Wednesday, 3 June 2015

आमच्या पुरोगामी शेजारणीचं आत्मचिंतन..!


आमच्या पुरोगामी शेजारणीचं आत्मचिंतन..!
=============
माझ्या घरात मला काळं कुत्रं विचारत नाही.. उलट माझ्या विदुषकी चाळ्यांमुळे मला पाहाताच घरचे लोक सोटा घेउन मला हाणायला धावतात.                           म्हणुन मी शेजा-याच्या घरी जाउन माझे "पुरोगामी, धर्मनिरपेक्श" वगैरे विदुषकी चाळे करु लागले..   बाकी आमच्या शेजा-यांकडे मजाच आहे सगळी. तिथे माझ्यासारख्या विदुषकांना डोक्यावर घेउन नाचतात.  माझे चाळे सुद्धा थोडे दिवस डोक्यावर घेतले त्या लोकांनी.. पण मग थोडे दिवसानी अजुन पाच-दहा विदुषक सापडल्यावर माझ्याकडं कुणी पाहीनासं झालं हो.. 
त्यात माझ्या घरच्यांनीही मला तंबी दिली , " बायो, शेजा-याच्या घरी राहुन जरी थेरं करत असशील तरी आम्ही तिकडं येउन हाणु ".. नी शेजारघरचे नवधनी तर माझ्या चाळ्यांकडं लक्षही देत नाहीत..  आता काय करावं बरं?

चला, आता इथुनही दुगाण्या झाडत प्रस्थान ठेवावं. जो सा-या गावाचा फौजदार, त्या 'उस' (पक्षी: US) पाटलाच्या परसात नांदावं. फौजदाराघरी येउन मला हाणायची कुणाची हिम्मत आहे?
========
"आत्ताची वेळ" कडुन आत्ताच्याच वेळी हाती आलेल्या बातमी नुसार
"I'll return to India, When feel Safe" अश्या टिवटिवाटी दुगाण्या झाडत ही आमची विदुषकी शेजारीण "ऊस"पाटलाच्या परसाकडं चालती झालेली आहे.                                      नी तिच्या जाण्यामुळं जगबुडी आल्याच्या थाटात आमच्या भाडखाऊ मिडीया मधे मातम सुरु झालं आहे..!