गेले दोन दिवस 'तुर्कस्थानी' किनार्यावर वाहुन आलेल्या एका सिरियन चिमुकल्याच्या निष्प्राण कलेवराचा फोटो नी त्यावर सोडले जाणारे व्होल लॅाट सुस्कारे ह्यांचा अगदी पूर आलाय सोशल मिडिया वर..!
खरं सांगतो..
रोज रात्री माझं कोकरु जेव्हा माझ्या किंवा त्याच्या आईच्या कुशीत शिरुन झोपतं तेव्हा असंच गोड दिसतं..
पहिल्यांदा हा फोटो पाहीला तेव्हा नखशिखांत हादरलो.. टचकन पाणी आलं डोळ्यात..
छोटासा लाल लाल टी शर्ट, निळी चड्डी, पायात 'बुटु', तांबुस केस.. निघाली असेल स्वारी आईचा वा बाबाचा हात धरुन.. आईने सांगितलं असेल कदाचित ' चला शोनुड्या, भुर जायचं ना?' त्यावर त्या येडुनी मस्त मान डोलावली असेल..
विस्थापितांनी, काठोकाठ भरलेल्या बोटीवर चढताना कदाचित घाबरलंही असेल ते पिल्लु इतकी गर्दी पाहुन.. मग बाबानी एका हातानी बॅगा सावरत दुस-या हातानी ह्याला कडेवर घेउन समजावलं असेल.. ' झालं शोन्या, दोनच दिवस इथे राहायचं कि मग आपण आत्या/ काकुकडे जाणार ' असं काही बाही.. समजुन हसला असेल हा..
आईच्या कडेवर बसुन समुद्र पाहाणार्या
ह्या सोन्याचे मऊमऊ केस समुद्राच्या खार्या वार्यावर उडत असतील. आईनी लगेच त्याचे केस सारखे केले असतील.. इतक्यात, काहीसं खायला घेउन ह्याचा बाबा आला असेल.. तो ही आई कडुन छान भरवुन घेतोय, आज आपण घरी नाही, पटकन खाउन घेउ हे कळलय का त्याला?
खाऊ खाउन झाल्यावर हळु हळु बाळोबा पेंगायला लागलेत.. बाबानी बोटीच्या मागल्या भागात एक कोपरा शोधुन तीथं आईला बसु दिलय नी आईच्या मांडीवर हे बाळ गोड हसत हसत झोपलय.. आई थोपटत्ये.. बाजुला उभा असलेला बाबा आता शेजा-याशी गप्पा मारतोय.. पुढं काय करायचं कुठे जायचं ह्याचा हिशोब मांडतोय बहुतेक..
इतक्यात पुढल्या बाजु कडुन गलका ऐकु येतोय.. लोकांच्या झुंडीच्या झुंडी बोटीच्या मागल्या भागा कडे येतायत.. कोणितरी ओरडलं.. बोट बुडत्ये..
बाबा नी आता आई नी बाळाभोवती स्वत:ला ओणवं तोललय.. गर्दीचा त्रास नको व्हायला बाळाला म्हणुन..
अजुन काही क्षण जातात..
एव्हाना सगळा अवकाश लोकांच्या आरोळ्यांनी, बायका- पोरांच्या रडण्यानी व्यापुन गेलाय.. आपला गोडुला पण ह्या आवाजानी जागा झालाय.. पण आई बाबा आहेत जवळ म्हणुन शांत आहे.. तेवढ्यात काहीतरी धक्का बसतो.. नी बोट हादरते.. इतका वेळ ओणवा असलेला बाबा आता उभा राहीलाय.. आईसुद्धा ह्याला सावरत कशीबशी उभी राहात्ये.. बाळ गांगरलय..
लोकं आता पुरती भैसाटल्येत.. वाटेत येइल ते आणि त्याला तुडवत आता त्यांना बोटीची न बुडालेली बाजु गाठायच्ये.. अशाच एका पळणार्याचा धक्का बाबाला लागतो, बाबा पुढे आईवर रेलतो नी आई कडेवरच्या बाळासकट पाण्यात फेकली जाते..
हे अचानक काय ओलं ओलं नी गार गार?
नी हे काय जातय माझ्या नाकात..?
आई ?
आई?
बाबा?
कुठाय आई?
म माझ.. माझी.. आ...?
आणि क्षणभरात संपलं असेल का सगळं?
असंच घडलं असेल का?
कुठे गेली असेल त्याची आई? नी बाबा? तो कुठं गेला असेल? ते तरी जगले असतील का?
आणि अशाप्रकारे अत्यंत दुर्दैवी अंत झालेल्या एका बाळाचे फोटो काढणारा नी ते प्रसारित करणारा महाभाग कोण असावा बरं?
इतका हलकट - नीच इसम ह्या भुतलावर असु शकतो?
नी पश्चिमी देश तिथल्या मिडिया मार्फत हा फोटो उचलुन धरतायत? युद्धबंदीसाठी दबाव आणण्या करता एका २-३ वर्षाच्या पोराच्या कलेवराचे फोटो वापरताय रे भाडखाउंनो?
लाजा नाही वाटत एकालाही?
उद्या देव न करो पण तुमचं मुल असं कुठं मरुन पडलं असेल तर त्याचे फोटो काढुन दाखवाल का रे षंढांनो असेच जगाला?
स्साला, त्या इसिस सारखेच तुम्ही पण तितकेच विकृत आहात रे..
Feeling Frustrated...! 😡